पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला; भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी झाल्याची माहीती आहे. या घटनेनंतर भाजपाने तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील रामपूर गावात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला … Read more

जवानांनी केलेल्या कारवाईत गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र कारखाना उद‌्‌ध्वस्त – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा कारखाना 70 जवानांनी केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. निवेदन करताना गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले, आपल्या जवानांनी केलेली ही कामगिरी अभिमानास्पद असून 70 जवानांनी 48 तासाच्या या कारवाईत नक्षलवाद्यांच्या कोअर एरियामध्ये जावून शस्त्रास्त्रांचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत एक जवान जखमी झाल्याचे … Read more

‘अँटिलिया’ समोर स्फोटक पदार्थ असलेली चारचाकी सापडल्याच्या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. 5 : मुकेश  अंबानी  यांच्या  ‘अँटिलिया’  निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात येत असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली. तत्पूर्वी गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले, मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थ सापडलेली स्कॉर्पिओ गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती. ही गाडी सॅम पीटर न्यूटन यांच्या मालकीची होती. … Read more

बॉम्बच्या अफवेने ताजमहालमध्ये उडाली खळबळ, पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात

नवी दिल्ली :  आग्रा येथील ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरवणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. मूळचा फिरोजाबादचा असणार्या या तरुणाने पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर फोन करुन ताजमहालच्या आत स्फोटकं ठेवण्यात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्या नंतर पोलिसांनी सर्व पर्यटकांना ताजमहालमधून बाहेर काढत दरवाजे बंद करण्यात … Read more

“या” कारणासाठी बेळगावचे पालकमंत्र्यानी दिला राजीनामा

  गोकाक : बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. त्यांनी नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका युवतीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार बंगळूर पोलिसांत करण्यात आली आहे. रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यानां एक पत्र लिहिले असुन त्यात आपण निर्दोश असल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी होई पर्यंत आपण स्वत: बसुन मंत्री पदाचा राजीनामा देत … Read more

धक्कादायक: मंत्र्यावर बॉम्बहल्ला

  कोलकाताः पश्‍चिम बंगालमध्ये सध्या गुन्हेगारी वाढली आहे. धक्कादायक म्हणजे एका राज्यमंत्र्यावरच बॉम्बहल्ला झाला आहे. राज्यमंत्री झाकीर हुसेन यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे डझनभर कार्यकर्ते हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत मुर्शीदाबाद जिल्ह्यातील निमतिया रेल्वे स्टेशनवर हा हल्ला करण्यात आला. अज्ञातांनी झाकीर हुसेन आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने बॉम्ब फेकले. हल्ल्यात झाकीर हुसेन यांच्या पायाला मोठी जखम झाली … Read more

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: पोलिसांनी ‘त्या’ दोघांना घेतले ताब्यात

पुणे: बीड जिल्ह्यातील परळी येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. पूजा चव्हाणच्या आत्महत्येमागे विदर्भातील शिवसेना नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले आहे. पूजा चव्हाणच्या मित्राशी झालेल्या संभाषणाचे ऑडीयो क्लिप व्हायरल झाले आहे. मंत्री संजय राठोड यांचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर ११ दिवसांनी पोलिसांनी दोन जणांना … Read more

अखेर लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोपी जेरबंद: घरातून आढळल्या तलवारी

नवी दिल्ली: दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 26 जानेवारीला हिंसक वळण लागले होते. प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी हिंसाचार झाला होता. आंदोलनातील काही आंदोलकर्त्यांनी लाल किल्ल्यावर जाऊन पोलिसांना मारहाण करण्याबरोबरच धार्मिक ध्वज फडकावला होता. दरम्यान लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी दोन तलवारी जप्त … Read more

आमदार प्रताप सरनाईक ‘कनेक्शन’; ‘एमएमआरडीए’ आयुक्तांना ईडीची नोटीस

मुंबईः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान आता आमदार प्रताप सरनाईक यांचे टॉप्स सिक्युरिटी प्रकरणाशी मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांचे संबंध समोर आले आहे. त्यामुळे एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांना ईडी (सक्तवसुली संचलनालय)ने समन्स बजावले आहेत. या प्रकरणात आमदार … Read more

गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदेंचा मृतदेह आढळल्याने खळबळ

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान दत्तात्रय शिंदे यांचा मृतदेह मोदी स्मशानभूमीलगत असलेल्या रेल्वे रुळावर आढळून आल्याने खळबळ उडली आहे. भगवान शिंदे नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले होते. उशिरापर्यंत ते घरी परतले नसल्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. दरम्यान अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मोदी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पुलावरुन खाली पडल्याने छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याची माहिती … Read more