खळबळजनक ! बच्चू कडूंच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

अमरावती :  देशभरात शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन पेटलं असतानाच अमरावतीतून ही दुःखद बातमी आली. अमरावतीतील बडे नेते बच्चू कडू यांच्या नवे चिठ्ठी लिहून एका संत्रा उत्पादक शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अशोक पांडुरंग भुयार (अंजनगाव सूर्जी ता.धनेगाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.   याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दीपक श्रावण … Read more

….म्हणून सुरेश रैनासह ३४ बॉलिवूड सेलिब्रिटींवर गुन्हा झाला

मुंबई । भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनासह बॉलिवूड सेलिब्रिटींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील पबमध्ये पार्टीदरम्यान कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्याविरोधात आहे.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच असलेल्या ड्रॅग्नोफ्लाय पबमध्ये सुरेश रैनासह उपस्थित असलेल्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या पबवर पोलिसांनी धाड टाकली. त्यानंतर रैनासह ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.   … Read more

वर्ध्यातील बँकेवर दरोडा ; लाखोंच्या रोकडसह साडेतीन किलो सोने, दुचाकी घेऊन दरोडेखोर पसार

वर्धा : वर्ध्यातील मुथुट फायनान्सच्या बँकेवर आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी लाखोंची रोकड आणि साडेतीन किलो सोने लुटले. त्यानंतर कर्मचाऱ्यांची दुचाकी घेऊन पसार झाले. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.   वर्ध्यामध्ये मुथुट फायनान्सच्या शाखेवर आज, सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी दरोडा पडला. दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून … Read more

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

पुणे : ज्येष्ठ दांपत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायाधीश एम.पी. परदेशी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.   याप्रकरणी अमन चढ्ढा (२८, रा. बापोडी, पुणे) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता औंध येथील एका बँकेसमोर … Read more

कांदा विक्रीस घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांवर काळाचा घाला ; भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू, एक जखमी

आराधवाडी : कांदा घेऊन सोलापूरकडे निघालेल्या नेकनूर (ता.केज, जि. बीड) येथील शेतकऱ्यांवर काळाचा घाला पडला आहे. आयशर टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे सोलापूर – उस्मानाबाद मार्गावरील आराधवाडी(ता.तुळजापूर) नजीक घडलीय.   याबाबत थोडक्यात असे की,  नेकनूर (ता.केज, जि. बीड) येथील शेतकरी … Read more

अरे बापरे … धावत्या बसमध्ये घुसला ८० फुटांचा गॅस पाईप; दोन ठार, १२ गंभीर जखमी

राजस्थानमध्ये एक धक्कादायक दुर्घटना घडली.  ८० फुटांचा गॅस पाईप थेट रस्त्यावरुन जाणाऱ्या बसच्या आरपार गेला.  या दुर्घटनेमध्ये एका महिलेसहीत दोन जणांचा दूर्देवी मृत्यू झाला. या अपघातात १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पाली जिल्ह्यातील सांडेराव पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलीय. चार पदरी रस्त्याच्या बाजूने गॅसची पाईपलाइन टाकण्याचं काम सुरु होतं. मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास … Read more

वाळूच्या टिपरखाली सापडून मोटारसायकलवरील दोन तरुणांचा मृत्यू ; एक गंभीर

वेळापूर (सोलापूर) : वेळापूरच्या पूर्वेला उघडेवाडी – धानोरे रोड क्रॉसिंगवर एक भीषण अपघात झाला. टिपरखाली येऊन मोटारसायकलवरील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. तुषार शहाजी जाधव (वय 18) व देवा बाबासाहेब माने (वय 28) असे अपघातातील मृत्यू झालेल्या तरुणांचे नावे आहेत. तर तिसरा … Read more

भर दिवसा मनसे पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या

ठाणे : ठाण्यात भर दिवसा मनसे पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जमिल शेख मनसे पदाधिकारी यांचे नाव आहे.  मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी शेख यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर गंभीर अवस्थेत शेख यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. शव विच्छेदनासाठी त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात … Read more

कार-टँकरच्या भीषण अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यासह चार जणांचा मृत्यू

बीड : बीड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला.  कार व ऑइल टँकरच्या भीषण अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) सकाळी दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई शहराजवळ घडलीय.  मृतांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचा समावेश आहे. वंचित आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह … Read more

जादुटोण्याच्या संशयावरून इंजिनीअर तरुणाला खुर्चीला बांधून जिवंत जाळले

हैदराबाद:  जादुटोण्याच्या संशयावरून इंजिनीअर तरुणाला खुर्चीला बांधून जिवंत जाळल्याची घटना तेलंगणातील जोगतियाल जिल्ह्यातील बलवंतपूरमध्ये घडली. पवन कुमार असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी आणि सासरच्या सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पवन कुमार जादूटोणा करत असल्याचा संशय त्यांना होता. त्याची पत्नी कृष्णावेनीचा भाऊ जगन याचा १२ दिवसांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला … Read more