‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय

मुंबई : वृत्तसंस्था नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाच्या सखोल आणि निष्पक्ष चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, या पथकाच्या प्रमुखपदी आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य गृह विभागाच्या निर्देशानुसार, अशोक खरात याच्याविरुद्ध नाशिक … Read more

गुढीपाडव्याचा जल्लोष राज्यभर; शोभायात्रा, ढोल-ताशा आणि भगव्या रंगात महाराष्ट्र रंगला !

मुंबई : वृत्तसंस्था  मराठी नववर्षाचा पहिला दिवस असलेला गुढीपाडवा सण आज राज्यभर मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला. मुंबई, ठाणे, नागपूरसह अनेक शहरांमध्ये भव्य शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असून ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांनी सजलेल्या वातावरणात संपूर्ण महाराष्ट्र रंगून गेला. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. नववर्षाच्या स्वागतासाठी घराघरांत गुढी … Read more

दैवी शक्तीच्या नावाखाली अत्याचार? ‘अंकशास्त्रज्ञ’ खरात अटकेत; ५८ व्हिडिओंमुळे खळबळ

नाशिक : वृत्तसंस्था  नाशिक शहरात तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावरणारा कॅप्टन अशोक खरात याला गंभीर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राचा आधार घेत महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे कारवाई करत त्याला … Read more

बलात्कार आणि भोंदूगिरी प्रकरणात धक्कादायक आरोप; अंधारेचा चाकणकरांना सवाल

नाशिक : वृत्तसंस्था नाशिकमध्ये ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याच्या आरोपाखाली स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी खरातच्या ताब्यातून एक पेनड्राइव्ह जप्त केला असून, त्यात ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्य महिला आयोगाच्या … Read more

संतापजनक : सहावीच्या शाळकरी मुलीवर धक्कादायक ॲसिड हल्ला !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था   जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या इयत्ता सहावीतील एका अल्पवयीन मुलीवर अज्ञात युवकाने ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळ काढल्याने परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी शाळेतून घरी जात असताना अचानक समोर आलेल्या युवकाने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. मुलीने आरडाओरड … Read more

अजित पवारांच्या विमान अपघाताचा संशय घेऊन रोहित पवारांचा विधिमंडळात धक्कादायक इशारा!

मुंबई : वृत्तसंस्था  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात चर्चा व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु, अद्याप या मुद्यावर विधानसभेत चर्चा करण्यास परवानगी मिळालेली नाही, अशी माहिती रोहित पवारांनी दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ११ वेळा राज्याचे बजेट … Read more

‘नोकरी घालवू’ धमक्यांना कंटाळून पोलिस शिपायाने घेतला टोकाचा निर्णय; प्रेयसीच्या पालकांवर गुन्हा !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई पोलिस दलात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण पोलिस शिपायाने मानसिक छळ आणि धमक्यांना कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भैयासाब भीमराव व्हावळे (वय ३२, मूळ रा. जि. नांदेड) असे मृत पोलिस शिपायाचे नाव असून, त्यांनी कलिना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात गळफास घेऊन जीवन संपवले. या प्रकरणी वाकोला … Read more

दहावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याचा हल्ला; आरोपीसह 4 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात!

पुणे : वृत्तसंस्था  पुण्यातील ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालय मध्ये दहावीची परीक्षा सुरू असतानाच एका विद्यार्थ्यावर भयंकर हल्ला घडला. सोमवारी सकाळी एका अल्पवयीन आरोपीने परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला. विद्यार्थ्याने वार हातावर झेलल्यामुळे मोठा अपघात टळला, मात्र तो जबर जखमी झाला. ओतूर पोलीसांनी आरोपीसह इतर ४ जणांना ताब्यात घेतले असून, प्राथमिक … Read more

लोकसभेत निलंबित आठ खासदारांचे निलंबन रद्द; काँग्रेस आणि डाव्या पक्षाचे सदस्य परत सभागृहात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात निलंबित करण्यात आलेल्या आठ खासदारांवरील निलंबन मंगळवारी रद्द करण्यात आले. यामध्ये काँग्रेसचे सात आणि डाव्या पक्षाचा एक खासदार समाविष्ट आहे. त्यांना ४ फेब्रुवारी रोजी संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते. निलंबनामागील घटना २०२० मधील भारत-चीन सीमा तणावावर राहुल गांधींच्या चर्चेदरम्यान घडली होती. या दरम्यान अध्यक्ष कृष्ण … Read more

जितेंद्र आव्हाडांनी सभागृहात अपमानास्पद वक्तव्य केले ; मंत्री देसाई !

मुंबई : वृत्तसंस्था मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले की, विधानसभेत काल धर्मस्वातंत्र्य बिलावर चर्चा सुरू असताना जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक संदर्भ देताना शिवरायांच्या राज्याभिषेकांसंदर्भात अपमानास्पद वक्तव्य केले. सभागृहात उपस्थित राहून ते म्हणाले की, आव्हाड यांना या वक्तव्याचे गांभीर्य नव्हते आणि त्यांनी माफी मागायला तयारही नव्हते, ज्यामुळे सभागृह तहकूबले. शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले की, अध्यक्षांनी … Read more