---Advertisement---

“या” कारणासाठी बेळगावचे पालकमंत्र्यानी दिला राजीनामा

Follow Us:
---Advertisement---

 

गोकाक : बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. त्यांनी नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका युवतीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार बंगळूर पोलिसांत करण्यात आली आहे.

रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यानां एक पत्र लिहिले असुन त्यात आपण निर्दोश असल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी होई पर्यंत आपण स्वत: बसुन मंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हंटले आहे.

राज्याचे राजकारण उलथवून टाकणारा राजकारणी म्हणून रमेश जारकीहोळी यांचा चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे या सीडी प्रकरणाने राज्यभरात वावटळ उठले आहे. सीडीची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू असल्याने राजकीय धुळवड सुरू झाली आहे. विरोधकांकडून आरोप सुरू झाला असून, सत्ताधारी भाजपचे नेते मात्र तथ्य आरोप सिद्ध झाल्यास कारवाई करू, असे सांगत आहेत. हा प्रकार नेमका ब्लॅकमेलिंगचा आहे की त्या तरुणीची खरोखरच फसवणूक आहे, याचा सखोल तपास करावा, अशी मागणी माहिती हक्‍क कार्यकर्ते दिनेश कल्लहळ्ळी यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!