सोलापूर – अक्कलकोट रोडवर भिषण अपघात, तिन ते चार जण जागीच ठार

सोलापूर : सोलापूर – अक्कलकोट रोडवर कुंभारी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचा मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितिनुसार या अपघातात अंदाजे तीन ते चारजण जागीच ठार झाले आहेत. अक्कलकोटहून एक प्रवासी जीप (क्रूझर जीप, एमएच 13 एएक्स 1237) सोलापूरच्या दिशेनं निघाली होती. भरधाव असलेल्या जीपचा अचानक पुढील टायर फुटला. … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा पथकाच्या कारवाईत ३१ लाख रुपये किमतीचा बनावटी विदेशी मद्यसाठा वाहनासह जप्त

मुंबई, दि. 28 : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने बटकणंगले ता, गडहिंग्लज येथे केलेल्या कारवाईत एकूण 31,40,200 रुपये किंमतीचा गोवा बनावटीचा विदेशी मद्य साठा वाहनासह जप्त केला आहे. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, श्री. कांतिलाल उमाप व संचालक उषा वर्मा (दक्षता व अंमलबजावणी), राज्य उत्पादन शुल्क, विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क, ठाणे विभाग … Read more

दिल्लीत एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, AK-47, 50 गोळ्या, हँड ग्रेनेड जप्त

दिल्ली : देशात सध्या सणासुदीची धामधुम सुरू आहे. नवरात्रौत्सव सुरू असतानाच दिवाळीच्या तयारीचीही सुरुवात झाली आहे. याच दरम्यान, राजधानी दिल्लीत मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आज सकाळी दिल्लीतील लक्ष्मीनगर येथून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. मोहम्मद अशरफ अली असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो दिल्लीत … Read more

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, गोवा राज्य निर्मित दारू साठा जप्त

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क, मा.विभागीय उपआयुक्त श्री. प्रसाद सुर्वे सो तसेच मा. श्री. नितिन धार्मीक अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांच्या पथकाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क माळशिरस व पंढरपूर विभाग यांचे समवेत कटफळ गावचे हददीत, आटपाडी –पंढरपूर रोडच्या डाव्या बाजूस, हॉटेल किनारा … Read more

अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या दिल्लीतील रोहिणी न्यायालय परिसरात गोळीबार, गोळीबारात गॅंगस्टार जितेंद्र उर्फ गोगीची हत्या

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील राजधानी अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या रोहिणी न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारी कुख्यात गुन्हेगार जितेंद्र उर्फ गोगी याला न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी वकीलाच्या वेशामध्ये आलेल्या दोन जणांनी त्याच्यावर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देताना विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांनीही गोळीबार केला. यामध्ये दोन हल्लेखोरांसोबत गुन्हेगार गोगी याचाही मृत्यू झाला. … Read more

महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत; अत्याचारातील नराधमांना वचक बसवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई  :  माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, त्यासाठी पूर्ण पाठबळ देण्यात येईल. यातून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा, असे मुख्यमंत्री … Read more

मुख्यमंत्र्यांनी स्वत: आयोगाच्या उपाध्यक्षांना बोलविले चर्चेस, साकीनाका प्रकरणी तपासात कुठलीही ढिलाई नसल्याबद्दल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे समाधान

मुंबई दि. 13: साकीनाका येथे महिलेवर बलात्कार होऊन त्यानंतर तिच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी एकूणच पोलिसांनी त्वरेने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केले आहे. राज्य शासन याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी या घटनेत राजकारण आणता कामा नये असे देखील स्पष्ट केले. आज मुख्यमंत्री उध्दव … Read more

नगरसेविका फिरदोस पटेल यांची सतर्कता,  दोन मुलांसह आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या महिलेचे मन परिवर्तन : मोठी दुर्घटना टळली 

सोलापूर – गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने संपूर्ण परिस्थितीच बदलून टाकली आहे .सामान्य नागरिकांना तर जगणे मुश्कील बनले आहे .हाताला काम नसल्यामुळे अनेकांच्या चुली पेटणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत जीवाचे बरे वाईट करण्याची मानसिकता वाढू लागली आहे. रविवारी मात्र एक कुटुंब नगरसेविका फिरदोस पटेल यांच्यामुळे बचावले. विजापूर रस्त्यावरील धर्मवीर संभाजी तलावात आपल्या दोन मुलांसह आत्महत्या … Read more

पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ७ :- पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक असून या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींना अटक करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल. पुणे पोलिसांनी गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाची व आरोपींच्या अटकेची कारवाई केली. माणुसकीला काळीमा … Read more