राज्यातील 29 महापालिकांसाठी आज निवडणूक बिगुल?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई, ठाणे, पुण्यासह तब्बल 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेची जवळपास सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, आज सायंकाळी 4 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोगाची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांच्या तारखा, मतदानाचा कालावधी आणि निकाल … Read more

थकवा, अशक्तपणावर मात करा; रक्तवाढीसाठी दोनच घटक पुरेसे !

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) जाणवते. शरीरात रक्त कमी झाल्यास थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, कामात लक्ष न लागणे अशा अनेक समस्या उद्भवतात. काही वेळा परिस्थिती गंभीर झाल्यास डॉक्टरांना रक्त चढवावे लागते. मात्र, योग्य आहार घेतल्यास ही समस्या नैसर्गिक पद्धतीने दूर करता येऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, रक्तवाढीसाठी बीट आणि पालक हे दोन अत्यंत उपयुक्त … Read more

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषण : राज्यातील शेतकऱ्यांची ‘या’ दिवसापर्यंत होणार कर्जमाफी !

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे वचन पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली असून, कर्जमाफीचा लाभ केवळ शेतकऱ्यांनाच मिळावा यावर सरकारचा ठाम भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. कर्जमाफी योजनेसंदर्भातील अधिकृत घोषणा १ जुलैपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, … Read more

बाप-लेकाच्या अंदाधुंद गोळीबारात १६ जणांचा दुर्देवी मृत्यू !

सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील बॉन्डी बीच येथे रविवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृतांची संख्या वाढून १६ वर पोहोचली आहे. या हल्ल्यात १० वर्षांची चिमुकली मुलगी आणि एका इस्रायली नागरिकाचाही मृत्यू झाला असून, ४५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बॉन्डी … Read more

जनतेची फसवणूक अन हे ‘वांझोटे अधिवेशन’ ठरले ; महाविकास आघाडीचा हल्लाबोल !

नागपूर : वृत्तसंस्था येथे पार पडलेल्या सात दिवसांच्या हिवाळी अधिवेशनातून विदर्भातील जनता व शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते भास्कर जाधव म्हणाले की, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारी तिजोरीतील पैसा खर्च करण्यासाठीच हे … Read more

कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे ; सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील नागपुर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज रविवारी शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांनी केलेल्या आरोपांना आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. त्यामुळे आज सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडण्याची शक्यता आहे. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी … Read more

शिंदे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार ; प्रकाश आंबेडकरांचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खिशात घातले आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत एकनाथ शिंदे … Read more

माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा : ‘या’ दिवशी घडणार राजकारणात मोठी घडामोड !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठे विधान केले होते त्यावर आता पुन्हा एकदा त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “येत्या 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार आहे. अमेरिकेतील एका इस्त्रायली गुप्तहेराने केलेल्या स्टिंग ऑपरेशनची माहिती बाहेर येणार असून, त्यामुळे अनेक बडे … Read more

लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरेंची मोठी घोषणा !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारला महत्वाची ठरलेली लाडकी बहिण योजनेसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्याची केवळ एकदाच संधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ही अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आहे. योजनेच्या बहुतांश लाभार्थी या ग्रामीण आणि दुर्गम भागातील … Read more

ग्रंथ प्रकाशनात मंत्री नितीन गडकरींच्या आठवणींना उजाळा !

नागपूर : वृत्तसंस्था महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त नागपूर येथील विधान भवनात आयोजित ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (दि. १३) उपस्थिती लावून उपस्थितांना संबोधित केले. या वेळी आपल्या भाषणात गडकरी यांनी विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा दिला. “राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दरवर्षी अधिवेशन काळात अनेक विद्यार्थी येथे … Read more