---Advertisement---

जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी दिल्याप्रकरणी सीबीआयने केली लालूप्रसाद यादव यांची चौकशी

Follow Us:
---Advertisement---

पटना : जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी दिल्या प्रकरणी सीबीआयने लालूप्रसाद यादव यांची चौकशी केली. दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने राबडीदेवी यांचीही चौकशी केली होती. लालूयांची तब्बल तीन तास चौकशी सुरू होती.  सिंगापूर येथे किडनी ट्रान्सप्लान्ट झाल्या नंतर लालूप्रसाद यांचा मुक्काम मुलगी मिसा भारती हिच्या घरी आहे.

जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणात सीबीआयच्या चार्जशीटनुसार कोर्टाने लालू, राबडीदेवी आणि मिसा यांना समन्स पाठवले होते. चौकशी दरम्यान वा नंतर लालू यांची प्रकृती बिघडली तर त्याचे गंभीर परिणाम होतील, दिल्लीचे तख्त उखडून टाकू,  असा इशारा लालू यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!