---Advertisement---

भारतीय किसानच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची निवड

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२३ : अककलकोट तालुक्यातील बोरोटी येथील काँग्रेसचे कार्यकर्ते व आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे कट्टर समर्थक चंद्रकांत पाटील यांची भारतीय किसान यूनियन सरकार दिल्लीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.पाटील यांना लहानपणापासून जनसेवेची आवड आहे.त्यांनी १९९२
मध्ये अककलकोट तालुका काँग्रेस उपाअध्यक्षपद,९१ मध्ये ग्रामपंचायत सदस्य होते.आता भारतीय किसान यूनियन सरकार दिल्ली राष्ट्रीय उपाध्यक्ष व भारतीय किसान यूनियन स्वराज्य दिल्ली यांच्या कर्नाटकातील विजय कर्नाटक वेदके कर्नाटक राज्य प्रदेश अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. या पदावर
काम करणारे अककलकोट तालुक्यात एकमेव व्यक्ती आहेत.सतत गोर गरिबांच्या व लोकांच्या मदतीला ते सतत धावून जातात.जय जवान जय किसान या तत्वावर ते काम करत आहेत. अनेक शेतकऱ्यांना आर्थिक सरकारी सवलती मिळून दिले आहे. शेतकऱ्यांच्या योजना घरापर्यंत पोचविण्याचे काम पाटील यांनी चांगल्या पद्धतीने केले आहे. याबद्दल माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!