---Advertisement---

चपळगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी महेश पाटील यांची फेरनिवड

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.२९ : चपळगाव (ता.अक्कलकोट) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी महेश पाटील यांची फेरनिवड करण्यात आली.सरपंच उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामसभा संपन्न झाली.या सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.मागील वर्षी महेश पाटील यांनी उत्कृष्ट तंटामुक्त समितीचे कामकाज केल्यामुळे सर्वानुमते या निवडीस अनुमोदन झाले.यापुढील काळातही अशाच प्रकारे गाव तंटामुक्त ठेवून गावाचा लौकिक तालुक्यात वाढविणार असल्याचे पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
या निवडीप्रसंगी ग्रामसेवक एस.बी कोळी, ज्येष्ठ नेते अंबणप्पा भंगे, युवा नेते बसवराज बाणेगाव,गंगाधर कांबळे, राजा कोळी, सिद्धाराम भंडारकवठे,मनोज इंगोले, पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप वाले, श्रावण गजधाने, महिबूब तांबोळी,सुरेश सुरवसे आदींची उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!