---Advertisement---

चपळगाव विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अप्पासाहेब पाटील; बिनविरोधची परंपरा कायम

Follow Us:
---Advertisement---

 

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध झाली असुन चेअरमनपदी अप्पासाहेब पाटील यांची झाली आहे.
तर व्हाईस चेअरमनपदी खंडप्पा वाले यांची निवड करण्यात आली आहे.निवडीनंतर नुतन संचालक मंडळाने ग्रामदैवत श्री मल्लिकार्जून मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गावातील मुख्य मार्गावरून नुतन संचालक मंडळाची विजयी मिरवणूक काढण्यात आली.बिनविरोध निवडीत मल्लिकार्जुन फताटे,कुमार दुलंगे,उमरशा मकानदार,विलास बावकर,सुरेश सुरवसे,पंडित भुसूणगे,परमेश्वर कांबळे,माणिक बोकडे,रमेश भंगे,अन्नपूर्णा बाणेगांव,अर्चना पाटील आदींचा समावेश आहे.सत्कारास उत्तर देताना नुतन चेअरमन पाटील यांनी आगामी काळात सोसायटीच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणार असल्याचे सांगितले.यावेळी माजी सभापती संजीवकुमार पाटील,जेष्ठ नेते सिद्धप्पा कल्याणशेट्टी,सचिव अंबण्णा दुलंगे,
अंबणप्पा भंगे,ब.रे.मठदेवरू,सिध्दाराम भंडारकवठे,विवेकानंद हिरेमठ,कुमारप्पा पाटील,पंडीत पाटील, नंदकुमार पाटील,बसवराज बाणेगांव,अभिजीत पाटील,गंगाधर कांबळे,महादेव वाले,राजु भंगे,दिपक पाटील,अबुजर पटेल उपस्थित
होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.एस.वाघमोडे यांनी काम पाहिले.
तर पाटील यांच्या निवडीबद्दल गौरू अचलेरे,
बम्मा म्हमाणे,दयानंद फताटे,सोमनाथ बाणेगांव,शरणू ख्याडे,गंगाराम ख्याडे,पमू भुसूणगे,दिलु बुगडे,दया वाले,प्रदीप सुरवसे,अंबण्णा डोळ्ळे,मेघराज इंगुले,शिवराज सराटे,शिरू अचलेरे
आदींनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!