---Advertisement---

चुंगी येथील ‘लावण्यरंग’ कार्यक्रमात हाणामारी

Follow Us:
---Advertisement---

 

सचिन पवार

अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे अमोघसिद्ध महाराज यांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लावण्यरंग या कार्यक्रमा दरम्यान मोठी हाणामारी पाहायला मिळाली.यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.लावणीचा कार्यक्रम असल्याने कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती.मध्यंतरी असा गोंधळ झाला. त्यानंतर यात्रा पंच कमिटीने शांततेचे आवाहन केले. मात्र या शांततेला न जुमानता काही तरुणांनी अचानक जागेवरून उठून बेदम मारहाण सुरू केली त्यामुळे धावाधाव झाली.एकच गदारोळ झाला.यात्रा पंच कमिटीच्या सदस्यांनी पुन्हा कार्यक्रमाला आलेल्या लोकांना शांतता राखण्यासाठी विनंती केली.

 

वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. आणि सर्वांना पुन्हा खाली बसवून कार्यक्रमास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा तेच कृत्य सुरु होते आणि पुन्हा वाद विवाद सुरू झाला. त्यामुळे कार्यक्रमाला आलेल्या महिलावर्गानेही काढता पाय घेतला. आणि लोकांची गर्दीही कमी झाली. मात्र कार्यक्रमास अशा प्रकारे वारंवार व्यत्य येत असल्यामुळे अखेर कार्यक्रम अर्धवट झाला.यावेळी कार्यक्रमाचा पन्नास टक्के भागही पूर्ण झालेला नव्हता. असे होत असल्याने कार्यक्रम आयोजकांना नाईलाजाने आटपावा लागला आणि अखेर कार्यक्रम बंद झाला. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.कमिटीने वारंवार सूचना देऊन आवाहन करून देखील कार्यक्रम यशस्वी झाला नाही. त्यामुळे रसिक प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त झाली.

 

पोलीस प्रशासनावर प्रश्न

सुरुवातीला पोलीस कार्यक्रमास हजर होते. मध्यंतरी वाद-विवाद सुरू असताना पोलिस नेमके कुठे गेले आणि जर पोलिस असले असते तर अशा प्रकारचे कृत्य घडले नसते आणि कार्यक्रम यशस्वी झाला असता,असा आरोप काही रसिक प्रेक्षकांनी केला.हाणामारी सुरू असताना पोलीस कुठेही दिसून आले नाहीत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!