---Advertisement---

ब्रेकिंग…..! राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी 14 मार्च 2020 रोजी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा बाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काहीही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज प्रसिद्धी पत्रक जारी करून ही माहिती दिली. 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षण प्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

14 मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळे परीक्षा घेणे योग्य नसल्याने ती पुढे ढकलण्यात यावी, असे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग मदत व पुनर्वसन विभागाकडून लोकसेवा आयोगाला कळविण्यात आले होते त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.


Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!