---Advertisement---

सोलापुरातील भाविकांच्या वाहनाला तिरुपती जिल्ह्यात अपघात ; ४ ठार तर ५ जण जखमी

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : सोलपुरहून तिरूपतिला देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला तिरूपति जिल्ह्यात अपघात झाला आहे. ही घटना आज दुपारी घडला. बुधवारी तवेरा कार (वाहन क्रमांक एमएच – १२ पीएच – ९७०१) दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चार जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. चंद्रगिरी मंडळातील नायडूपेट-पूथलापट्टू मुख्य रस्त्यावर ही घटना घडली.

महाराष्ट्रातील सोलापूर येथील नऊ जणांचा जथ्था तिरुमला येथे दर्शन घेऊन कानिपाकमकडे जात असताना हा अपघात झाला. ऋषिकेश, मयूर, अजय, रोहन, राहुल, श्रीनार्लेकर, अंतरवू, सुनील आणि अंबादास अशी या वाहनातील प्रवाशांचे नावे आहेत. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तिरुपतीच्या रुईया रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पश्चिम डीएसपी नरसप्पा रुया रुग्णालयात पोहोचले. चंद्रगिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!