---Advertisement---

भिशीच्या पैशांचा वाद : महिलेसह पाच मुलांचे अपहरण

By team
On: May 9, 2024 10:18 AM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर : 

जिल्ह्यातील चितेगाव येथे भिशीच्या पैशांच्या वादातून महिलेसह तिच्या पाच मुलांचे अपहरण केल्याची घटना ६ मे रोजी पैठण तालुक्यातील चितेगावमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली असून, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार चितेगाव येथील भिशी चालवणारी महिला मुमताज अहमद शेख (३८) यांनी हिना शेख यांच्याकडून ३० हजार, तर फातेमा शेख यांच्याकडून १ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यातील काही रक्कम परतही केली होती. परंतु, भिशीच्या पैशांच्या वादातून जावेद कलीम शेख, गंगाराम शेका राठोड, अस्लम युनूस पठाण, फतिया शेख, शबाना, सीमा, शिल्पा (पूर्ण नाव माहीत नाही) इतर दोन जण (सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी संगनमत करून मुमताज शेख यांच्यासह त्यांची मुले अब्दुल रहिम (११), आलिया (८), अलफिया (६), रुखिया (५), अरशिया (३) यांचे अपहरण केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!