---Advertisement---

एस.जी परमशेट्टी दुधनी प्रशालेत गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार

Follow Us:
---Advertisement---

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.२३ : श्री शांतलिंगेश्वर शिक्षण प्रसारक संस्था हिरेजेवर्गी दुधनी संचलित श्री एस.जी परमशेट्टी प्रशालेतील शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ मध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत यश मिळविलेल्या विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात दुधनी केंद्रात व प्रशालेत कुमारी श्रृती सिद्धाराम नुला व कुमारी नेहा महादेव हंगरगी यांनी दहावीत ९३.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला तसेच कुमारी प्रभा मल्लिकार्जून देशमाने हिने ९३.२० टक्के गुण मिळवून प्रशालेत व केंद्रात द्वितीय क्रमांक पटकविला कुमारी विजयालक्ष्मी सिद्धाराम परमशेट्टी हिने ९०.२० टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक पटकाविल्या मुळे प्रशालेचे मुख्याध्यापक आर.जी आलिगावे व पर्यवेक्षक एल.एस गद्दी यांनी या विद्यार्थ्यांचा पुष्पहार घालून सत्कार करुन अभिनंदन केले व सत्कार मुर्तींनी आपल्या मनोगतात गुरुजनामुळेच आम्ही घडलो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी पालक सिद्धाराम नुला,महादेव हंगरगी, मल्लिकार्जून देशमाने, सिद्धाराम परमशेटटी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डी.एच हिळळी यांनी केले तर आभार एन. व्ही कलबुर्गी यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!