---Advertisement---

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौर्यापुर्वीच मनसेला मोठा धक्का, रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मनसेला केला “जय महाराष्ट्र!”

Follow Us:
---Advertisement---

पुणे : मनसे नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौर्यापुर्वीच रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मनसेच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुढील दोन दिवस पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. मात्र राज ठाकरे हे पुण्यात येण्याआधीच रुपाली ठोंबरे-पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यादी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात असे म्हटले आहेत की, मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदांसह पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. “आपण दिलेला बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं, यापुढेही आपल्या आशीर्वादाने “श्री. राज ठाकरे” हे नाव हृदयात कोरलेले कायम राहील” अशी भावना व्यक्त ठोंबरे-पाटील यांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!