---Advertisement---

घरबसल्या कामाचा शोध : 94 लाखात फसवणूक !

By team
On: November 30, 2023 9:17 AM
Follow Us:
---Advertisement---

नाशिक : वृत्तसंस्था

पार्ट टाइम जॉबच्या बदल्यात जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवून एकास टास्क देऊन तब्बल ९४ लाखांस गंडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात भरण्यास भाग पाडण्यात आले असून, मुद्दलीसह जास्तीचा परतावा पदरात न पडल्याने इसमाने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबड येथील वृंदावननगरातील हर्षल संजय शिंपी यांनी तक्रार दाखल केली आहे. शिंपी १५ नोव्हेंबर रोजी इंटरनेटवर घरबसल्या कामाचा शोध घेत असताना टेलिग्राम आयडीधारक व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधत गुंतवणुकीवर जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखविले. त्यासाठी शिंपी यांना टास्क देण्यात आले. टास्क पूर्ण करण्यासाठी शिंपी यांनी संशयितांच्या सांगण्यावरून विविध बँक खात्यात पैसे भरले असता ही फसवणूक झाली. शिंपी यांनी तब्बल ९४ लाख १३ हजार ४४१ रोकड भरूनही मुद्दलासह मोबदला न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!