---Advertisement---

सोन्याची चमक फिकीः घसरण सुरुच !

On: March 5, 2021 11:40 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत घसरण सुरुच आहे. लग्न सराईचा काळ सुरु असतांनाही सोन्याच्या दरात घसरण होत आहे. जागतिक बाजाराचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. सोने 44 हजारांखाली आले आहे. आज शुक्रवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 43890 दहा ग्रॅमसाठी आहे. तर 24 ग्रॅम सोन्याचे दर 44890 रुपये आहे.

सध्या एमसीएक्सवर एक किलो चांदीचा भाव 66885 रुपये आहे. त्यात 1115 रुपयांची घसरण झाली आहे.

दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 43950 रुपये झाला आहे. त्यात बुधवारच्या तुलनेत 650 रुपयांची घट झाली. मंगळवारी सोने 350 रुपयांनी स्वस्त झाले होते. 24 कॅरेटसाठी सोन्याचा भाव 47950 रुपये झाला आहे. चेन्नईत 22 कॅरेटसाठी 42170 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 46020 रुपये आहे. त्यात 500 रुपयांची घसरण झाली आहे. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 44300 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 47000 रुपये आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!