---Advertisement---

आदर्श पत्रकार पुरस्काराने स्वामीराव गायकवाड यांचा सन्मान

By team
On: April 7, 2024 10:17 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

तालुक्यातील कुरनूर येथे लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले लोकाभिमुख पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एड. शरदराव फुटाणे हे होते.

जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजनाथ चिल्ले ,अक्कलकोटचे श्रीमंत मालोजीराजे भोसले , मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता विभागाचे मंगेश चिवटे ,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, जिल्हा परिषदेचे माजी पक्षनेते आनंद तानवडे, ज्येष्ठ नेते प्रभाकर मजगे,तुकाराम बिराजदर, विजय तानवडे,मोहन चव्हाण , आयोजक बाळासाहेब मोरे पत्रकार मारुती बावडे आदीचीं प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा सन्मान चिन्ह , शाल, पुष्पहार देऊन फेटा बांधून मान्यवराच्यां हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास पत्रकार नंदकुमार जगदाळे, राजेश जगताप , सोहेल फरास , रशिद खिस्तके, मोरे,राजू मोरे,विनोद मोरे,प्रमोद मोरे,मोहन शिंदे ,रानबा काळे,किशोर काळे,महेश मोरे,बाबासाहेब मोरे,परशुराम बेडगे,तुकाराम जावीर,भीम मोरे,डॉ.रणजित शिंदे,बाबासाहेब शिंदे,राहुल बावडे, सचिन पवार,अप्पा खांडेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार स्वामीराव गायकवाड यांना पत्रकारितेतील पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!