---Advertisement---

‘स्नेहलोक’च्या शिबिरात १७६ जणांचे रक्तदान

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील स्नेहलोक यूथ फाऊंडेशनच्यावतीने आयोजित शिबिरात १७६ जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून प्रथमेश म्हेत्रे उपस्थित होते.या शिबिरात नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दरवर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत असतो मध्यंतरी कोरोना काळात रक्ताची मोठ्या प्रमाणात टंचाई होती. आजही ती कायम आहे ही बाब लक्षात घेऊनच हे शिबिर घेण्यात आले असे पाटील यांनी सांगितले. यावेळी दक्षिण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप काळे, नागनाथ सुरवसे, काशिनाथ पाटील, धनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन आकाश पुजारी, शिवराज स्वामी आदी उपस्थित होते.स्नेहलोक यूथ फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी यासाठी परिश्रम घेतले. धर्मराज भोसगी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!