---Advertisement---

कर्नाटकात १४ दिवसांच्या लॉकडाऊन; अत्यावश्यक सेवांना चार तासांचा मुभा

Follow Us:
---Advertisement---

बंगळुरू : महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान पाठोपाठ कर्नाटकात वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन जाहीर केली आहे. कर्नाटकात दररोज १० हजारांहून अधिक रुग्नांची नोंद केली जात आहे. कर्नाटकात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही २ लाख ६२ हजारांवर पोहचली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत कर्नाटक हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रभावित राज्य ठरल आहे. कोरोनामुळे कर्नाटकात १४ हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहे.

मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे, राज्यात दिल्ली आणि महाराष्ट्रापेक्षाही वेगानं कोरोना संक्रमण फैलावत आहे. त्यामुळे राज्यात १४ दिवसांसाठी ‘कर्फ्यू’ लावण्यात येत आहे. कर्नाटकात दिवस-रात्र लागणारा या कर्फ्यूला उद्या रात्रीपासून सुरूवात होणार आहे.

या कडक निर्बंधांदरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांना सूट दिली जाणार आहे. किराणा आणि आवश्यक वस्तूंची दुकानंही केवळ चार तास उघडण्याची परवानगी देण्यात आली अहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर खुलं राहणार आहे मात्र गारमेन्ट आणि कन्स्ट्रक्शन सेक्टर बंद राहणार आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन निर्बंधाची कठोरता स्थानिक अधिकाऱ्यांच्या हातात सोपवण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या निर्बंधांसोबतच आणखी एक घोषणा केली आहे. त्यानुसार, कर्नाटक राज्यात १ मेपासून १८ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना सरकारी रुग्णालयांत मोफत लस दिली जाणार आहे. ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी अगोदरपासूनच मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!