---Advertisement---

कुरनूर विकास सोसायटीच्या चेअरमनपदी नितीन शिंदे, व्हाईस चेअरमनपदी बालाजी मोरे

Follow Us:
---Advertisement---

 

सचिन पवार

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी नितीन शिंदे यांची तर व्हाईस चेअरमनपदीपदी बालाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.विकास सोसायटीच्या नूतन संचालकांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. गावातील चार गटातील संचालकांना चेअरमन पदाची संधी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.ही निवडणूक सर्वानुमते बिनविरोध झाली होती.चिठ्ठी टाकून चेअरमन व व्हाईस चेअरमन अशी निवड करण्यात आली.
पुढच्या वर्षी देखील याच पद्धतीने निवडी
पार पडणार आहेत.यावेळी नूतन संचालक दादासाहेब मोरे, गोपीनाथ मोरे, काशिनाथ काळे, प्रभावती बिराजदार, वैशाली बेडगे, संतोष काळे, दयानंद मोरे, हरिदास काळे, रमेश पोतदार, शिवाजी चेंडके, सुभाष बनसोडे यांच्यासह सरपंच व्यंकट मोरे,
उपसरपंच आयुब तांबोळी,राहुल काळे,बाबासाहेब पाटील,भीम मोरे,अप्पू काळे,निवडणूक निर्णय अधिकारी धडस,सचिव प्रताप जाधव उपस्थित होते.निवडीनंतर नुतन संचालकांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. सरपंच मोरे यांनी विकासासाठी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू असे मनोगतात बोलताना म्हणाले.तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.आभार किशोर कासार यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!