---Advertisement---

ललित पाटीलसह तिघांची ऑर्थर रोड कारागृहात रवानगी !

By team
On: December 19, 2023 10:40 AM
Follow Us:
---Advertisement---

नाशिक : वृत्तसंस्था

पुण्याच्या ससून रुग्णालयातून एमडी ड्रग्जचे रॅकेट चालविणारा व येथून फरार झालेला बहुचर्चित ड्रग्ज माफिया संशयित ललित पाटीलसह तीन संशयितांचा नाशिक पोलिस कोठडीतील दहा दिवसांचा मुक्काम संपला. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे आता पुन्हा मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहात त्यांची रवानगी होईल.

ललित पाटील व रोहित चौधरी, जिशान शेख, हरीशपंत यांचा ताबा नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या शुक्रवारी घेतला होता. त्यांना ९ तारखेला जिल्हा व सत्र न्यायालयापुढे होते. हजर केले. न्यायालयाने चौघांना थेट १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सोमवारी कोठडी संपल्याने त्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायाधीश यू.जी. मोरे यांच्या न्यायालयाने चौघांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!