---Advertisement---

”त्या” वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी पुकारला पुणे बंद

Follow Us:
---Advertisement---

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी पुण्यात बंद पुकारला आहे. त्यामुळं आज शहरातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली असून अनेक ठिकाणी प्रशासनानं पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. पुणेकरांनीही मविआनं पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद दिला असून अनेक भागांतील दुकानं लोकांनी स्वत:हूनच बंद ठेवली आहेत.

मविआ आणि विविध सामाजिक संघटनांनी बंद पुकारल्यानंतर आता पुण्यातील एफसी रोड, जंगली महाराज रोड, लक्ष्मी रोड, विद्यापीठ चौक, डेक्कन आणि अलका टॉकीज चौकात बंद पाळण्यात येत आहेत. दुकानं बंद असल्यानं वाहतुकही मंदावली आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनानं शहरातील चौकाचौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!