---Advertisement---

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये हजारो भाविकांची मांदियाळी; वटवृक्ष मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठया भक्तीभावाने साजरी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.७ : अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी महाराज की जय घोषात सोमवारी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठया भक्तीभावाने उत्साहात साजरी करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमेस श्री वटवृक्ष मंदिरात अनन्य साधारण असे महत्व आहे. या पौर्णिमेस महाराष्ट्र राज्याच्या काना कोपऱ्यातून आलेल्या हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

पौर्णिमेनिमित्त पहाटे ५ वाजता पुरोहीत मंदार व मोहन पुजारी यांच्या हस्ते चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत स्वामींची काकड आरती संपन्न झाली. त्यानंतर स्वामी भक्तांच्या दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले. स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता नित्यनियमाने होणारे अभिषेक आज बंद ठेवण्यात आले होते. सकाळी साडे आकारा वाजता देवस्थानच्या वतीने श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आले.स्वामींच्या पालखीसह परगावाहून पायी चालत निघालेले स्वामीभक्त व अन्य स्वामीभक्त आज स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले.

पुणे, दौंड, मालेगाव, मसले चौधरी, बार्शी, उस्मानाबाद, जेजुरी, सोलापूर, मुंबई इत्यादी ठिकाणांहून दिंडी व पालखी सोबत हजारो पदयात्री स्वामीभक्त श्रींच्या दर्शनाकरिता आले होते.याप्रसंगी चेअरमन इंगळे यांनी आलेल्या दिंडी व पालखीचे स्वागत व पूजन केले. तदनंतर या दिंडीसोबत आलेल्या हजारो स्वामी भक्तांनी देवस्थानच्या भक्त निवास येथे महाप्रसादाचा लाभ घेतला.

सर्व भाविकांची महाप्रसादाची सोय वटवृक्ष देवस्थानच्या वतीने करण्यात आली होती. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होऊन कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता चोख नियोजन करण्यात आले होते. सर्व भाविकांना शिस्तबद्ध स्वामींचे दर्शन व्हावे या करीता बंदोबस्ताकरिता आलेले पोलीस कर्मचारी व समितीचे सर्व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. येणारा भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वटवृक्ष मंदिराच्या दक्षिण महाद्वार लगत भव्य कापडी मंडप उभारण्यात आला होता. भाविकांना मार्गदर्शन करण्याकरिता पोलीस बंदोबस्त व देवस्थानचे कर्मचारी सेवेकरी तैनात होते. वृद्ध व विकलांग भाविकांना स्वतंत्र व्हीलचेअर वरून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. सायंकाळी ७ वाजता कार्तिक दिवा लावून हजारो दिव्यांच्या दीपप्रज्वलनाने दीपोत्सव साजरा करून त्रिपुरारी पौर्णिमेची सांगता करण्यात आली.उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार बाळासाहेब सिरसट, मुख्याधिकारी सचिन पाटील, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी बैठक घेतली होती त्या नियोजनाप्रमाणे सर्व कार्यवाही पार पडली.याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, दयानंद हिरेमठ,  प्रा.शिवशरण अचलेर, गिरीश पवार, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, महादेव तेली, अविनाश क्षीरसागर, मनोज जाधव, महेश मस्कले यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी, सेवेकरी उपस्थित होते. 

फुलांच्या सजावटीने मंदिर परिसर गजबजला

पौर्णिमेनिमित्त वटवृक्ष मंदिरास आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ही सजावट पुणे येथील गुरू माऊली भजन मंडळाचे अध्यक्ष दीपक वायकर, युवराज याळवंडे,बंटी जाधव या स्वामी भक्तांनी केली होती. त्यांना सहकार्य सुधीर माळशेट्टी केले. सर्व स्वामी भक्तांची ही रोषणाई लक्ष वेधून घेत होते. याच मंडळाने शेख नूरद्दीन बाबा दर्गाह येथे स्वामी भक्तांना महाप्रसाद वाटप केले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!