---Advertisement---

आ.विजयकुमार देशमुख यांनी घेतला स्वामी समर्थांचे दर्शन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाच्या छायेने साक्षात स्वामी समर्थांचे वावर अनुभवले आहे. त्यामुळे स्वामी दर्शनाकरिता येथे येणाऱ्या भाविकांना स्वामींचे आशीर्वाद पाठीशी असल्याचे जाणवतात. विश्वशांतीचे प्रतिक असलेले येथील अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ जगाला सन्मार्ग दाखविणारे गुरूमाऊली आहेत. माझ्यासह त्यांचा आशिर्वाद महाराष्ट्रातील तमाम जनतेला लाभत रहाव्यात अशी प्रार्थना स्वामी चरणी आहे. नेहमीप्रमाणे आज या प्रसंगी मलाही समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर येथील वटवृक्षाच्या छायेत स्वामी माऊलींचे आशीर्वाद जाणवत असल्याचे प्रतीपादन सोलापूरचे माजी पालकमंत्री व आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.

यावेळी आमदार देशमुख बोलत होते. याप्रसंगी त्यांनी मंदिर समितीकडून मंदीरात करण्यात आलेले गाभारा नुतनीकरण व परिसर सुशोभीकरणामुळे मंदीरातील स्वामी भक्ती व स्वामी दर्शनाच्या प्रसन्नतेची अनुभूती शब्दाने अवर्णनीय असल्याचे मनोगतही व्यक्त केले. यावेळी जेष्ठ नेते मल्लीनाथ स्वामी, अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, नगरसेवक महेश हिंडोळे, शिवकुमार चनशेट्टी, दयानंद बिडवे, राजकुमार कोळी, रामचंद्र समाणे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!