---Advertisement---

अक्कलकोटचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव आला आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.गेल्या काही दिवसांपासून मुख्याधिकारी पाटील हे कर्मचाऱ्यांसमवेत बाजारपेठेमध्ये रॅपिड अँटीजन टेस्ट माध्यमातून लोकांच्या संपर्कात जात होते.कोरोना विषयक विविध उपाययोजनांच्या माध्यमातून नागरिकांचा संपर्क झाला होता.अशा परिस्थितीत त्यांना काल त्रास जाणवू लागल्याने त्यांची रॅपिड टेस्ट झाली होती.यामध्ये ते पॉझिटिव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. नागरिकांनी याबाबतीत सतर्कता बाळगावी,अंगावर कोणी काढू नये, टेस्टिंगला प्रतिसाद द्यावा आणि घराबाहेर कोणी पडू नये,या बाबतीत शहरातील नागरिकांनी देखील खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!