---Advertisement---

बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांच्यावर नवी जबाबदारी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : अक्कलकोट येथे मागील 4 वर्षांपासून कार्यरत असणारे बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांची नुकतीच कुर्डुवाडी येथे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून प्रशासकीय बदली झाली.  मागील 4 वर्ष पासून आपल्या खेळाडू वृत्तीने सर्वांचे मन जिंकून अक्कलकोट तालुक्यात विविध उपक्रम राबवून बालविकासच्या उत्तम योजना राबवरणारे बालाजी अल्लडवड यांनी केलेल्या कामकाजाची माहिती अक्कलकोट तालुक्यातील सर्व जनतेला तर माहिती होतीच. पण मागील वर्षभरात आपल्या विविध अभियानाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे नाव रोशन करणारे दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर हे आपल्या अधिनस्त काम करण्याच्या सर्व चांगल्या अधिकाऱ्यांना ओळखून असतात आणि सोलापूर जिल्हयाचे नाव अजून खूप उंचावर नेण्यासाठी ते या आपल्या अधिकाऱ्याला अतिरिक्त कामकाज पण सोपवतात.

याचेच फलित म्हणून आपल्या अक्कलकोट तालुक्यातुन कुर्डुवाडी येथे जाणारे बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवड यांच्यावर देखील कुर्डुवाडी सोबतच माळशिरस तालुक्याच्या बालविकास प्रकल्प कार्यालयची जबाबदारी बालाजी अल्लडवड यांच्यावर सोपविण्यात आली आहे.  बालाजी अल्लडवाड हे नेहमी विविध उपक्रम राबवून अतिशय उत्तम काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. याचा फायदा नक्कीच माळशिरस तालुक्यातील जनतेला देखील होईल, असा विश्वास जनतेतून निर्माण होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!