---Advertisement---

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला : ४ जागीच ठार ५ गंभीर जखमी

By team
On: February 24, 2024 10:41 AM
Follow Us:
---Advertisement---

हिंगोली : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून नेहमीच अपघाताची मालिका सुरु असतांना आज दि.२४ रोजी हिंगोलीमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पीकअपने ९ भाविकांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झालेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देवदर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकप वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. हे सर्व भाविक हिंगोली तालुक्यातील सिरसम गावचे रहिवासी आहेत.

आज २४, फेब्रुवारी शनिवारचा दिवस असल्याने हे भाविक सिरसम येथून माळहिवरा पाटी येथील मारुतीच्या दर्शनाला निघाले होते. मात्र या भीषण अपघातात पाच जणांचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी भाविकांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!