---Advertisement---

आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मैंदर्गीत उद्या पदयात्रा

By team
On: May 4, 2024 5:50 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मैंदर्गी शहरात उद्या (रविवारी) सकाळी ८ वाजता भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे.अक्कलकोट नाका मैंदर्गी येथुन या पदयात्रेला सुरुवात होईल.

यात आमदार प्रणिती शिंदे,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे,महिला तालुकाध्यक्ष शितल म्हेत्रे, बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे आदिंसह तालुक्यातील काँग्रेसची प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. सध्या अक्कलकोट तालुक्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय निश्चित आहे, असे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.तरी मैंदर्गीतील सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन पदयात्रेत सामिल व्हावे,असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!