---Advertisement---

राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, मिमिक्रीच पाहायची तर जॉनी लिव्हरची पाहू; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Follow Us:
---Advertisement---

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून त्यांची मिमिक्री केली होती. संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज यांनी केलेल्या टीकेचा अत्यंत खोचक शब्दात समाचार घेतला.

राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू. तीही ओरिजनल. आम्हाला मुद्रा अभिनय, नाट्याभिनय पाहायचा असेल तर आम्ही जॉनी लिव्हरचा पाहू. आम्हाला राजू श्रीवास्तव आवडायचा. इतर अनेक आहेत. आम्ही खरी मिमिक्री पाहू, असा टोला ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता लगावला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!