---Advertisement---

कोल्हापूरजवळ खाजगी बस उलटली : एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू !

By team
On: November 23, 2023 10:58 AM
Follow Us:
---Advertisement---

कोल्हापूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना कोल्हापूरच्या पुईखडी येथे एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात बुधवारी मध्यरात्री झाल असून गोव्यावरून मुंबईला जाणारी बस कोल्हापूर शहराजवळच्या पुईखडी येथे उलटली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर चौघेजण जखमी झाले आहेत. ही बस बुधवारी रात्री आठ वाजता गोव्यावरून निघाली होती. मध्यरात्री दोन वाजता बस कोल्हापूरच्या पुईखडी येथे पोहोचली असता ही बस उलटली.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हीआरएल कंपनीची मुंबईला जाणारी खाजगी स्लीपर कोच बस बुधवारी रात्री आठ वाजता गोव्यातील पणजी येथून निघाली. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास कोल्हापूर शहराजवळ पुईखडी येथे भरधाव बस उलटली. अपघाताची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, मुख्य अग्निशमन अधिकारी आणि करवीर पोलिस घटनास्थळी पोहोचले. या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. या बसमध्ये जवळपास २५ प्रवासी होते. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तर चार प्रवासी बसखाली अडकले होते, त्यांनादेखील बाहेर काढलं. तर १६ प्रवाशी सुखरूप आहेत. या अपघातात नीलू गौतम (४३), रिद्धिमा गौतम (१७) आणि सार्थक गौतम (१३) या तिघांचा मृत्यू झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!