---Advertisement---

सिंदखेडची कन्या प्रियंका मोरे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला !

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.५ : अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड येथील प्रियंका धनाजी मोरे ही उच्च शिक्षणासाठी उद्या शनिवारी ( दि.६ ) रोजी अमेरिका दौऱ्यावर जात आहे.तिचे शिक्षण बीई ऑर्किड कॉलेज सोलापूर येथे व एमबीएचे शिक्षण सिम्बॉयसिस कॉलेज पुणे येथे झाले असून पुढील शिक्षणासाठी तिला शिष्यवृत्ती मिळाली आहे.एम.एस अर्थात मास्टर इन इन्फॉर्मेशन सिस्टीम या कोर्समधील शिक्षणासाठी ती अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सिराक्यूस युनिव्हर्सिटी येथे दोन वर्षे शिक्षण घेणार आहे.सुरुवातीच्या काळात प्रियंका मोरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाला सुरुवात केली.आता ती उच्च शिक्षणासाठी परदेशात जात असल्याने ग्रामस्थांतून कौतुक होत आहे. शिक्षणासाठी आई शोभा व वडील धनाजी मोरे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली. त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न मी पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.तिच्या या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे,लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरीसिंग लंगडेवाले, सचिव मोहनसिंग फटफटवाले व सिंदखेड ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!