---Advertisement---

स्व.संतोष पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी चपळगाव येथे कार्यक्रम

By team
On: September 24, 2024 10:51 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

चपळगाव (ता.अक्कलकोट ) येथील माजी सरपंच संतोष पाटील यांच्या २२ व्या पुण्यस्मरणानिमित्त चपळगाव येथे गुरुवार (दि.२६ सप्टेंबर) रोजी सकाळी
१० वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संतोषदादा पाटील मित्र परिवाराने दिली आहे.

यानिमित्त चपळगाव येथील मधला मारुती बाजार गल्ली येथे प्रांगणात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी माजी सरपंच उमेश पाटील यांच्यासह विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,सर्व सदस्य,सोसायटी चेअरमन,व्हाईस चेअरमन,सर्व पदाधिकारी व तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.दरवर्षी पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक  उपक्रम राबविले जातात.यापूर्वी पाटील मित्र परिवाराकडून जनावरांसाठी तपासणी व लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.यानिमित्त ग्रामस्थांतर्फे अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे.तरी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन पाटील मित्र परिवाराने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!