---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुंबई येथे गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसचे निषेध आंदोलन

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : महाराष्ट्राचा अवमान करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुंबई येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.  यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, मंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री सुनील केदार, ऊर्जामंत्री नितीन राऊतसह नेते आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत भाषण करताना काँग्रेसमुळे कोरोना पसरल्याची टीका केली. त्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर आज राज्यात काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. यावेळी नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्राबद्दल केलेले वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. तर पाच राज्यात केलेल्या प्रचारातून कोरोना हा मोठ्या प्रमाणात वाढला अशी टीका त्यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!