---Advertisement---

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा समरसता प्रमुख सुनील गुमास्ते यांचे निधन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट,दि.१९ : अक्कलकोट तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष, बादोले येथील केपी गायकवाड प्रशालेचे मुख्याध्यापक,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा समरसता प्रमुख सुनील प्रभाकर गुमास्ते (वय- ५८ ) यांचे आज रविवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने पुणे येथे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष कै.सुनील गुमास्ते हे एका लग्नानिमित्त पुण्याला गेले होते. लग्नानंतर परत येत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येवून निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (सोमवारी) न्यू पॅलेस रोड, अक्कलकोट येथील राहत्या घरापासून निघणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!