---Advertisement---

सर्जेराव जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी विविध कार्यक्रम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोटचे समाजसेवक तथा पुणे येथील प्रमुख सरकारी वकील कै. एडवोकेट सर्जेराव जाधव यांच्या २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवार दि. ४ एप्रिल रोजी सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट शरदराव फुटाणे (जाधव) यांनी
दिली.दरवर्षी ट्रस्टच्यावतीने जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.यावर्षी देखील अक्कलकोट तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटकातील गरीब व गरजू व्यक्तींसाठी मोफत
नेत्र चिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय सकाळी १० वाजता श्रद्धांजलीपर कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉ.भीमाशंकर बिराजदार तसेच फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे नूतन अध्यक्ष राजीव माने हे उपस्थित राहणार आहेत.यावेळी फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या नूतन संचालकांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शरदराव फुटाणे (जाधव) हे राहणार आहेत.नेत्र चिकित्सा शिबीर सकाळी ११ ते २ या वेळेत पार पडणार असून या शिबिरात प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. अनुराधा अवस्थी,डॉ. वीरेंद्र अवस्थी हे सहभागी होणार आहेत.यावेळी कार्यकारी विश्वस्त सुरेशराव फडतरे, शंकरराव पवार, शिवाजीराव पाटील, मोहनराव चव्हाण, परितोष जाधव,माधुरी जाधव, संतोष फुटाणे
(जाधव) यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!