---Advertisement---

शनैश्वर देवस्थान ट्रस्टचा सुरक्षेचे कारण पुढे करत घेतला मोठा निर्णय !

By team
On: June 19, 2025 3:46 PM
Follow Us:
---Advertisement---

अहिल्यानगर : वृत्तसंस्था

राज्यातील अहिल्यानगर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून ११ जून रात्री साडेदहा ते पहाटे चार वाजेपर्यंत शनिचौथऱ्यावर तेल अर्पण करणे आणि चौथऱ्याच्या समोरून मुखदर्शन घेणे बंद करण्यात आले आहे. विश्वस्त मंडळाने मंदिर परिसराची स्वच्छता व सुरक्षेचे कारण पुढे करत हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.

शनैश्वर देवस्थान ट्रस्ट मालकीच्या भक्तनिवासातील खोल्यांची दुरवस्था झालेली आहे. तसेच गावातील खासगी लॅाजमध्ये आवश्यक खोल्यांची संख्या नसताना विश्वस्त मंडळाने रात्रीचे दर्शन बंद केल्याच्या निर्णयामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. देवस्थान मालकीच्या तीन भक्तनिवासांमध्ये आवश्यक चांगल्या सुविधा नसल्याने अनेक भाविकांना मुक्कामासाठी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर व शिर्डीचा जावे लागत आहे.

यामुळे गावातील लॅाजवर मुक्कामासाठी भाविक येत आहेत. तसेच लॅाजवरच जेवण, चहा, नाश्ता करत असल्याने व्यवसायांत वाढ झाली आहे. याचा फायदा स्थानिकांना होत आहे. मात्र, दुसरीकडे देवस्थानचे पदाधिकारी व काही विश्वस्तांचे खासगी लाॅज असल्याने देवस्थानच्या भक्तनिवासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची चर्चा देखील ग्रामस्थांमध्ये होत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!