---Advertisement---

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनी शरद पवार यांची मोठी घोषणा ; सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्याध्यक्षपदी केली निवड

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : राष्ट्रवादी कॉँग्रेसचा आज स्थापना दिवस असून या दिवशी पक्षाचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवण्याचा आज निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड आज घोषित केली. दिल्ली येथे सुरू असलेल्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा या आधी केली होती. त्यानंतर नाट्य घडले होते. त्याचवेळी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत होती. अखेर दोन कार्यकारी अध्यक्ष निवडण्यात आले असून यात सुप्रिया सुळे यांचा देखील समावेश आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

काही दिवसंपूर्वी चेंबूर येथील सभेत पवारांनी पक्षाचे अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली होती. या कार्यक्रमांत मोठे नाट्य पाहायला मिळाले होते. अखेर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आलीय असे म्हटले होते. मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थित नसल्याने त्यांनी त्यावेळी निर्णय घेण्याचे टाळले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!