---Advertisement---

शावळमध्ये शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथे शिवछत्रपती ग्रामविकास मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अभूतपूर्व उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.
यानिमित्त मूर्तीची प्रतिष्ठापना,मिरवणूक,
लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत भव्य पाळणा कार्यक्रम पार पडला. गावातील बहुसंख्य महिलांनी भगवी साडी आणि फेटा परिधान करून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते. बहुतांश लहान मुलांनी देखील भगव्या रंगाचे कपडे घालून वातावरण शिवमय केले होते.

या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव,फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे नूतन अध्यक्ष राजीव माने,नूतन संचालक बाळासाहेब मोरे,
संतोष जाधव ( फुटाणे ),उद्योगपती सुखदेव भिसे- पाटील, मल्लिनाथ भासगी,सरपंच सोमनिंग तामदंडी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष भीमाशंकर सुरवसे, श्रीमंत भोसले, उपाध्यक्ष सुधाकर पवार, खजिनदार कृष्णात पवार ,नितीन चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी संजय पवार, श्रीकांत पवार, पुंडलिक कोळी, कृष्णा मोरे, गणेश माने, धोंडीबा माने, सुशील सुरवसे, लक्ष्मण जाधव,सिद्धू सुरवसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.यानिमित्त शिवभक्तांना जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शिवा भोजनाची सोय मंडळाच्यावतीने
करण्यात आली होती.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!