मुंबई : काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्र वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेदच्या कपड्यावरून आक्षेप घेतला होता. चित्रा वाघ यांनी उर्फीचा नंगानाच महाराष्ट्रात चालणार नाही म्हणत तिच्या फॅशन स्टाइलवर आक्षेप घेतला. तिला अटक करण्याची देखील मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्यात ट्विटरवरून चांगलेच शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. त्यावरून आता त्यावरूनच आता ठाकरे गट नेत्या मनिषा कायंदे यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना ट्विटरवरून खोचक सवाल केला आहे. त्याला त्याला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत.
मनीषा कायंदे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा जुना फोटो शेअर करत चित्रा वाघ यांना सवाल केले आहेत. त्या ट्विट मध्ये म्हणाल्या होत्या की, भाजपच्या चित्रा वाघ यांना नंगाटनाच तुम्हाला मान्य आहे का?. असा सवाल मनिषा कायंदे यांनी केला होता. मनीषा कायंदे यांच्या या ट्विटला चित्रा वाघ यांनी ट्विट करून उत्तर दिले आहेत.
https://twitter.com/KayandeDr/status/1617753824650989568?s=20&t=jFCR7rLPv_QMqsRuA1RQ1w
मनिषा कायंदे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, शरीरसौष्ठव स्पर्धा कळतात का तुम्हाला ताई ? खासदार क्रीडा महोत्सव दरवर्षी घेणारे आमचे नेते नितीनजी गडकरी पुरस्कार वितरण करीत आहेत शरीरसौष्ठव स्पर्धेचे असो. कायम घरात बसून केवळ चकाट्या पिटणाऱ्यांना ते कळणार तरी कसे …? बाकी नंगानाच छत्रपतींच्या महाराष्ट्रात चालू देणार नाहीच.! असा इशारा त्यांनी यावेळी कायंदे यांना दिला आहे.
शरीरसौष्ठव स्पर्धा कळतात का तुम्हाला @manisha_kayande ताई ?
खासदार क्रीडा महोत्सव दरवर्षी घेणारे आमचे नेते नितीनजी गडकरी पुरस्कार वितरण करीत आहेत शरीरसौष्ठव स्पर्धेचे
असो॰कायम घरात बसून केवळ चकाट्या पिटणाऱ्यांना ते कळणार तरी कसे …?@CMOMaharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/vwiqMJmygh
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 24, 2023






