---Advertisement---

शिवशक्ती आणि भीमशक्ती एणार एकत्र ; आज शिवशक्ती आणि भिमशक्ती युतीची होणार घोषणा!

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेच्यावतीने आज राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हाच मुहूर्त साधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा देखिल घोषणा केली जाणार आहे. या युतीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत.

यापार्श्वभूमीवर आज दुपारी 1 वाजता यासंबंधित एक पत्रकार परिषद होणार आहे. या संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये असे म्हणतात शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एल्गार, संयुक्त पत्रकार परिषद. 23 जानेवारी दुपारी 12.30 वाजता. आंबेडकर भवन, नायगाव, दादर… महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व… असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

त्या सोबतच आज विधीमंडळामध्ये राज्य सरकारच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात येणार आहे. यासाठी ठाकरे परिवारातील सर्व सदस्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!