---Advertisement---

दिपावली पर्वावर वटवृक्ष मंदिरात पहाटगाण्यांचा स्वराविष्कार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२० – अनंतकोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी सदगुरु श्री स्वामी समर्थांच्या चरणी वंदन करून यंदाच्या दिपावलीच्या शुभ मुहुर्तावर येथील श्री वटवृक्ष मंदिरात पहाटगाण्यांचा सुमधूर स्वराविष्कार व अभंगसंध्या या भावभक्ती गीतांचा कार्यक्रम सोमवार दिनांक २४/१०/२२ ते बुधवार दिनांक २६/१०/२२ अखेर आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.

सोमवार दिनांक २४/१०/२२ व मंगळवार दिनांक २५/१०/२२ रोजी अक्कलकोट चे वेदशास्त्र संपन्न मनोहर देगांवकर (बी.एस. सी.बी.एड.एम.ए.संगीत व कीर्तन अलंकार) यांच्या सुमधूर स्वरातून (भावमय स्वरांजली) पहाटे ५:१५ ते सकाळी ८ या वेळेत पहाट गाणी व दिनांक २४/१०/२२ ते दिनांक २६/१०/२२ अखेर सायंकाळी ५:३० ते रात्री ८ या वेळेत ज्योतीष शास्त्र डॉ.संतोष देगांवकर (एम.ए.एम.फील.पी.एच.डी.) यांच्या सुमधूर वाणीतून अभंगसंध्या हा कार्यक्रम सादर होणार आहे. वरील सर्व कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात नियोजीत तारखेस व वेळेवर श्रींच्या चरणी सादर होतील, तरी दिपावलीनिमीत्त आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!