---Advertisement---

सोलापूर विधान परिषद निवडणूक रद्द; उद्या दुपारी बैठक

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.९ : सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेची निवडणूक पुढे गेल्याबद्दल आपण सर्वांशी चर्चा करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

निवडणूक आयोगाला सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून चुकीची माहिती पाठविण्यात आली आहे.  सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या संस्था कार्यरत असणाऱ्या मतदारांची संख्या ही ७५ टक्के पेक्षा जास्त आहे, असा आमचा दावा आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पक्षनेता, विरोधी पक्षनेता यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी उद्या ( बुधवारी ) सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे दुपारी १ वाजता या सर्वांची बैठक बोलवण्यात आली आहे. तरी सर्वांनी सदर बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन बळोरगी यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!