---Advertisement---

अक्कलकोट येथे राज्यस्तरीय ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेला प्रारंभ ; सोलापूर, जळगाव, अमरावती, लातूर, सांगली संघांची विजयी सलामी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.८ : श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुला – मुलींच्या २८ व्या ज्युनियर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत सोलापूर, जळगाव, अमरावती, लातूर, सांगली संघांने विजयी सलामी दिली.

फत्तेसिंह क्रिडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे हे होते. यावेळी प्रमुख उपस्थिती सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, नायब तहसीलदार बालाजी बनसोडे, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पाटील, सचिन किरनळी यांची होती.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून सोमनाथ गोंधळी सिंधुदुर्ग, श्रीकांत मदने, कोल्हापूर, मोहित पाटील, जळगाव, सोमनाथ सपकाळ, अहमदनगर, मुकेश बिराजदार, लातूर, श्रद्धा पवार, लातूर, किशोर काळे, बीड, प्रज्वल जाधव लातूर, गणेश बराटे, सोलापूर, जीशान जमादार, सोलापूर यांनी काम पाहिले.

या स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.संतोष गवळी, सचिव प्रा. संतोष खेंडे, सहसचिव प्रशांत कदम, खजिनदार शिवाजी वसपटे, संचालक मारुती घोडके, राहुल अन्यापनावर, विष्णू दगडे, प्रशांत राणे, अमोल कोकाटे, प्रा.दत्तात्रय बिराजदार ,सतीश कुमार परदेशी, श्रीधर गायकवाड, प्रकाश सोनटक्के, गंगाराम घोडके, प्रबुद्ध चिंचोलीकर, उमेश नेवाळे, दयानंद दणूरे परमेश्वर व्हसुरे व विनाश राठोड यांचे सहकार्य लाभत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

दुधनीत कलबुर्गी-कोल्हापूर आणि हुसेनसागर एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी नगराध्यक्ष म्हेत्रे यांनी दिले खासदार माने व वाघमारे यांना निवेदन

राज्यातील महिला परिचरांना दिलासा; मानधनात दुप्पट वाढ !

निवडणुकीतील आश्वासन पूर्ण; वडार गल्लीतील नागरिकांना मूलभूत सुविधांचा दिलासा !

गॅस टंचाईतही अक्कलकोट अन्नछत्राचा महाप्रसाद अखंड; दररोज 25 हजार भाविकांना भोजन

अक्कलकोट पंचायत समितीतमध्ये भाजपचे निर्विवाद वर्चस्व; १३ वर्षांनंतर पुन्हा सत्ता, कार्यकर्त्यांचा जल्लोष !

टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाची पुढची मोहिम : आयपीएलपूर्वी इंग्लंडविरुद्ध मालिका ‘या’ तारखेला होणार !

Leave a Comment

Don`t copy text!