---Advertisement---

विमानाचा समुद्रात थरार : हॉलिवूड अभिनेत्याचा २ मुलींसह विमान अपघातात मृत्यू !

By team
On: January 6, 2024 11:04 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

नव्या वर्षाच्या सुरुवातील हॉलिवूड सिनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘स्पीड रेसर’ आणि ‘वाल्किरी’सह इतर चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ख्रिश्चियन ओलिवरचा आणि त्याच्या दोन मुलींचा अपघाती मृत्यू झाला आहे. गुरुवारी न्यू इयरचं सेलिब्रेशन करुन घरी परतत असताना त्यांचे विमान कॅरेबियन बेटाजवळील समुद्रामध्ये कोसळलं. त्यांच्यासोबत विमानाचा पायलट रॉबर्ट सॅक्स याचाही मृत्यू झाला आहे.

जर्मन वंशाचा असलेला हॉलिवूड अभिनेता ख्रिश्चियन ऑलिव्हर गुरुवारी दि. ०५ जानेवारी रोजी त्याच्या खासगी विमानाने दोन मुलींसोबत प्रवास करत होता. विमान टेक ऑफनंतर काही वेळातच कॅरेबियन समुद्रात त्यांचे विमान कोसळल्याची बातमी तेथील स्थानिक पोलिसांनी दिली. ५१ वर्षीय ऑलिव्हर, मुलगी मॅडिटा (१० वर्षे) आणि ॲनिक (१२ वर्षे) सोबतच पायलट रॉबर्ट सॅक्स अशी मृतांची नावे आहेत.

त्यांच्या अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी, मच्छीमार आणि तटरक्षक ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लगेचच चौघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. अभिनेत्याचं विमान ग्रेनेडाइन्समधील बेकिया या छोट्या बेटावरून गुरुवारी दुपारी सेंट लुसियाला जात होते. ऑलिव्हर आपल्या दोन्हीही मुलींसोबत नवीन वर्षानिमित्त व्हेकेशनसाठी आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!