---Advertisement---

विजयकुमार हत्तुरेंची रासपला सोडचिठ्ठी, नाना पाटोलेंच्या उपस्थितीत झाला काँग्रेस प्रवेश

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर,दि.१९ : परिवहन समितीचे माजी चेअरमन विजयकुमार हत्तुरे यांनी रासपच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा त्याग करून काॅग्रेस पक्षात प्रवेश केला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हत्तुरे यांना मुंबईतील टिळक भवनात सन्मानपूर्वक प्रवेश दिला.

देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पक्षप्रभारी आ.एच के.पाटील,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,मुंबई अध्यक्ष आ.भाई जगताप मंत्री यशोमती ठाकुर,प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे, युवक अध्यक्ष सत्यजित तांबे,सोलापूर जिल्हा काँग्रेसचे समन्वय डाॅ.बसवराज बगले, उद्योजक संतोष फताटे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

लिंगायत धर्मगुरू श्री. शरणबसवलिंग महास्वामीजी ( सोलापूर ),आणि लिंगायत जगद्गुरु श्री.चन्नबसवानंद महास्वामीजी ( बेंगलोर ) यांच्या मार्गदर्शनानुसार माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या संमतीने विजयकुमार हत्तुरे आणि डाॅ.बसवराज बगले यांनी गांधी भवनात प्रदेशाध्यक्ष आ.नाना भाऊ पटोले यांच्याशी चर्चा केली. राजकीय संघटनात्मक बाबीविषयी धोरण ठरल्यानंतर टिळक भवनात काॅग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला.लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करून सर्व समावेशक काम करण्याची आणि संघटनेला प्राधान्य देऊन पक्ष बळकट करण्याची ग्वाही यावेळी विजयकुमार हत्तुरे यांनी दिली.

याप्रसंगी जगतज्योती महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासाठी भेट देण्यात आली.प्रदेश प्रभारी आमदार एच.के.पाटील यांनी याचे कौतुक केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!