---Advertisement---

विक्रम खेलबुडे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे पुन्हा अध्यक्ष

By team
On: September 8, 2024 5:36 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विक्रम खेलबुडे यांची एकमताने निवड करण्यात आली.सरचिटणीस म्हणून सागर सुरवसे तर किरण बनसोडे खजिनदार म्हणून निवड करण्यात आली.

गेल्या ११ वर्षापासून विक्रम खेलबुडे यांनी अविरतपणे अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पत्रकार संघाने पुन्हा त्यांना अध्यक्षपदाची माळ गळ्यात घातली आहे. रविवारी ८ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सर्व सभासदांनी एकमताने निवड करून विक्रम खेलबुडे यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी दिली आहे. त्याच बरोबर सलग दुसऱ्या वर्षी सरचिटणीस म्हणून सागर सुरवसे याना संधी देण्यात आली तर खजिनदार म्हणून किरण बनसोडे यांची निवड झाली. निवडी नंतर सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी एकत्र येवून जल्लोष केला यावेळी अनेक जुने नवीन सभासद उपस्थितीत होते. खेेलबुडे आणि नवीन पदाधिकारीयांची ही निवड सन २०२४-२०२५ या वर्षासाठी राहणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!