---Advertisement---

दोन्ही पवार येणार एकत्र ? राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण !

By team
On: December 6, 2025 4:19 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुती स्वबळावर लढली. मात्र, या निवडणुकांत महाविकास आघाडीचे अस्तित्व उरले आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक निवडणुकीत विचित्र प्रकाराच्या आघाड्या आणि युत्या झाल्या. पण चर्चा ही सर्वात जास्त महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली.

या निवडणुकीनंतर आता सर्वांना महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या पक्षाचे नेते पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर राजकारण सोडून देईल, असे मोठं वक्तव्य केले होते. आज त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटी घेतली असून, भेटीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. नेमकी भेटी कशासाठी घेण्यात आली, याबाबतही सविस्तर माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांसोबतच्या भेटीमध्ये पुणे शहराचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेखजोखा मांडला, त्यामुळे काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. पुणे महानगरपालिकेत कशी लढत राहील आपण महाविकास आघाडी सोबत लढलो तर काय होईल? इतर लोकांसोबत युती केली तर काय होईल याचा लेखाजोखा साहेबांसमोर मांडला असल्याचे प्रशांत जगताप यांनी माध्यमांना सांगितले. पवार साहेब यांनी स्पष्ट केलं आहे की पुण्यात आणि राज्यात आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढू, अशी महत्वाची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

आमचे श्रद्धास्थान पवार साहेब पूरागामी चळवळीला बळ देणारे नेते म्हणून ओळखले जातात. पुणे शहरातील महाविकास आघाडीतील लढत कशी राहिल यासंदर्भातील लेखाजोखा मी पवार साहेबांसमोर मांडला. पुणे शहरात आणि राज्यातही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. माझ्यासमोर प्रदेशाध्यक्षांना (शशिकांत शिंदे) यांना फोन करून त्यासंदर्भातील सूचना केल्या आहेत. शशिकांत शिंदे यांच्यासबोतची चर्चा झाली ती त्यांनी ऐकून घेतली. त्यानुसार आता पुणे शहरात महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले असल्याचे शरद पवार साहेबांना सांगितले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पुणे महापालिका आणि राज्यातील महापालिका निवडणुकीत एकत्र येणार नसल्याचे प्रशांत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!