---Advertisement---

देशभरात १६ जानेवारीपासून होणार कोरोना लसीकरण मोहिमेला प्रारंभ

On: January 9, 2021 5:52 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : देशभरात शनिवारी १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे. पंतप्रधानांनी आज आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही माहिती देण्यात आलीय.

पंतप्रधानांकडून या बैठकीत लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी कॅबिनेट सेक्रेटरी, आरोग्य सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन करोना योद्ध्यांना प्राथमिकता देत लस दिली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात जवळपास तीन कोटी फ्रंटलाईन आणि आरोग्य कर्मचारी यांना लस दिल्यानंतर ५० वर्षांहून अधिक वयांच्या नागरिकांना तसंच एखाद्या जुन्या आजारानं त्रस्त असलेल्या ५० वर्षांहून कमी वयाच्या नागरिकांना लस दिली जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!